World Milk Day : 7/12:दूध उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा कसा वाढेल?शेतकऱ्याला चांगला भाव का मिळत नाही?
abp majha web team | 01 Jun 2023 07:27 AM (IST)

दरवर्षी १ जूनला जागतिक दूध दिवस साजरा केला जातो. सध्या दूध उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कष्टाळू शेतकऱ्यांच्या मेहनतीचं हे यश आहे. त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला त्याला मिळतो का? दूध विक्रीत निकोप स्पर्धा शक्य आहे का? दूध उत्पादक आणि ग्राहक या दोघांचं हित साधत नफा कमावणं दूध संघांना शक्य आहे का, अशा काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात डॉ. राजेंद्र कोकणे यांच्याकडून.