Saat Barachya Batmya : 7/12 : पावसाने पाठ फिरवल्यानं शेतकरी चिंतेत ते तुरीच्या उत्पादनात घट
abp majha web team | 06 Sep 2023 07:24 AM (IST)
जून महिन्यात लांबलेला पाऊस आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं दिलेली ओढ.. यामुळे कोकणातील भात शेतीवर परिणाम झालाय.. मात्र अश्यातच रत्नागिराच्या शिरगावमधील शेतकरी मिलिंद खीर यांनी 'एक' या वाणाची लागवड केली. जून महिन्यात पाऊस लांबल्यानंतर शेतकरी मिलींद खीर यांनी शेतातील विहिरीतून भाताला पाणी दिलं. यामुळे भाताला आता लोंब्या आल्या आहेत. जवळपास ७० गुंठ्यामध्ये केलेली ही भात शेती पुढील १५ दिवसांमध्ये कापणी योग्य होणारे अशी प्रतिक्रिया खेर यांनी दिलीय. पाहुयात.