Saat Barachya Batmya 712 :Solapur:भाव न मिळाल्यानं 4 हजार पेंडी कोथिंबीर शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली
abp majha web team | 06 Aug 2023 08:24 AM (IST)
भाव न मिळाल्याने सोलापुरात जवळपास 4 हजार पेंडी कोथिंबीर शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिलीय.
शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिलेली कोथिंबीर गुरा-जनावरांना देण्यासाठी अनेकांनी नेली, तर काही महिलांनी किरकोळ बाजरात विकण्यासाठी ही कोथिंबीर नेली, जवळपास 160 किलोमीटर प्रवास करून बीडवरून सोलापूरच्या बाजारात विकण्यासाठी दोनशे कॅरेट कोथिंबीर आणण्यात आली होती, मात्र, कोथिंबीरीला भाव न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी ही कोथिंबीर रस्त्यावर फेकली.