Saat Barachya Batmya : 7/12 : कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क,शुल्काचा वांदा रडवतोय कांदा
abp majha web team
Updated at:
22 Aug 2023 07:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांद्याच्या पिकाची हिरवीगार रांगोळी शिवारभर पसरते... हा हा म्हणता, कांदा काढणीला येतो... घरदार खपून, मजुरांना पैसे देऊन कांद्याची काढणी करायची... शेतात कांद्याची तांबूस-लाल रंगाची रास लागते आणि शेतकरी आस लावून बसतो... आता हा कांदा विकून घर बांधता येईल, मुलांच्या शाळेत पैसे भरता येतील, म्हाताऱ्या आई-बापाचा दवाखाना करता येईल... कारभारणीला एखादी साडी घेता येईल... आणि घेतलेलं कर्ज फेडता येईल... असं स्वप्न बघता बघताच निर्णय येतो... निर्यातशुल्क वाढीचा... तितक्यात डोळ्यांतली स्वप्न जिथल्या तिथं गळून पडतात... आणि त्या स्वप्नांची जागा टचकन् घेतात... अश्रू... अशी सगळी अवस्था शेतकऱ्यांची होऊन बसलीय... पाहूयात...