Saat Barachya Batmya : 7/12 : APL धान्य योजना ते ऊस तोडणी यंत्रापर्यंत शेतीविषयक प्रत्येक अपडेट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App7/12 APL धान्य योजना ते ऊस तोडणी यंत्रापर्यंत शेतीविषयक प्रत्येक अपडेट. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान मिळणार. ३५ लाख रुपये किंवा ४० टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं अनुदान देण्यात येणार आहे. ऊस तोडणी यंत्रासाठी देण्यात येणारं अनुदान हे व्यक्तिगत तसेच शेतकरी उत्पादक संस्था, खासगी आणि सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्थांना देण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांच्या टंचाईवर मार्ग काढण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. वैयक्तिक शेतकरी, उद्योजकाच्या कुटुंबातील एकच व्यक्ती अनुदानास पात्र असणार. तर खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना पजास्तीत जास्त तीन यंत्रांसाठी अनुदान देण्यात येणार. लाभार्थ्यांनी यंत्राच्या किंमतीच्या २० टक्के रक्कम स्वभांडवल म्हणून गुंतवणूक करणं गरजेचं असणार. कृषी विभागाच्या महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन.