Muddyache Bola Chinchwad : चिंचवड पोटनिवडणूकीत 'काटे' की टक्कर? चिंचवडकरांचं 'मत' कुणाला?
abp majha web team | 20 Feb 2023 05:54 PM (IST)
चिंचवडची पोटनिवडणूक सध्या चर्चेत आहे... चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे मैदानात आहेत... यांच्यात थेट लढत होण्याची चर्चा असतानाच राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीसमोर आव्हान उभं राहिलंय... त्यातच कलाटेंना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलाय... तर भाजपला मनसेने साथ देण्याची घोषणा केलीय... त्यामुळे चिंचवडमध्ये अटीतटीची लढत स्पष्ट दिसतेय... या सर्व पार्श्वभूमीवर चिंचवडमधील मतदारांना आणि राजकीय पक्ष समर्थकांना काय वाटतं, कोण बाजी मारणार... हे सर्व आपण जाणून घेणार आहोत.... चला तर थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अभिजीत करंडे यांच्याकडे