Majha Vishesh भाजप नेत्यांचं शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील वक्तव्य का? सरकार शेतकऱ्यांचा किती अंत पाहणार?
एबीपी माझा वेब टीम | 10 Dec 2020 07:08 PM (IST)
नवी दिल्ली : कृषि कायद्याबाबत सरकारने पाठविलेला प्रस्ताव शेतकरी संघटनांनी फेटाळला आहे. आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले आहे. हा प्रस्ताव पुन्हा आला तर आम्ही त्यावर विचार करू असे शेतकरी नेते म्हणाले.
देशभर आंदोलन तीव्र करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे. 14 डिसेंबर रोजी देशभरात धरणे आंदोलन करण्यात येणार असून भाजप मंत्र्यांना घेराव घालण्यात येईल. तर 12 डिसेंबरला जयपूर दिल्ली हायवे आणि दिल्ली-आग्रा हायवे जाम करण्यात येणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.