Majha Vishesh | अर्णब विरुद्ध नाईक : कुणाचा न्याय, कुणानर अन्याय? माझा विशेष | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Nov 2020 06:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : अलिबाग येथील वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक झालेल्या रिपब्लिक वृत्तवाहिनेचे संपादक अर्णव गोस्वामींना तातडीनं कोणताही दिलासा देण्यास अखेर मुंबई उच्च न्यायालयानं नकारच दिला आहे. कायदेशीर नियमांचं पालन करत आरोपींकडे सत्र न्यायालयात रितसर जामीन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यानुसार तो त्यांना घ्यावा असं स्पष्ट करत अर्णबसह अन्य दोन आरोपींना अंतरिम दिलासा देण्याची मागणी हायकोर्टानं फेटाळून लावली. मात्र जामीन अर्ज दाखल होताच त्यावर चार दिवसांत निर्णय देण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहे. दरम्यान हायकोर्टाचा निकाल जाहीर होण्यापूर्वी काही मिनिटं अर्णब गोस्वामींच्यावतीनं अलिबाग सत्र न्यायालयाच जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.