Majha Vishesh | संसदेत लोकशाहीचा अपमान कुणी केला? सत्ताधारी जोरात तर विरोधकही तोऱ्यात | माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम | 22 Sep 2020 07:02 PM (IST)

नवी दिल्ली : विरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार टाकला आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधक संसदेच्या उर्वरित अधिवेशनात सहभाग घेणार नाहीत. कृषी विधेयकावरून झालेल्या खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईचा निषेध म्हणून विरोधकांनी ही भूमिका घेतली आहे.