Majha Vishesh | एमपीएससी आणि मराठा आंदोलन, 11 तारखेला काय होणार? परीक्षा तोंडावर,शासनाचा तोडगा नाहीच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2020 06:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना समाजाकडून आवाहन केलं जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन या दोन्ही राजेंवर जहरी टीका केली. पुण्यात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दोन्ही राजांचा आंदोलनाला पाठिंबा आहे, असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांनी यावेळी मराठा आरक्षणासाठी 10 तारखेला पुकारलेल्या बंदला पाठिंबा दिला आहे.