Majha Vishesh : उद्धव ठाकरे शिवसेनेला कोणती दिशा देणार? आज मुख्यमंत्री बोलणार की शिवसेना पक्षप्रमुख?
वृषाली यादव | 19 Jun 2021 05:41 PM (IST)
मुंबई : मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा आता 55 वा वर्धापन दिन साजरा होत असून, यंदाही वर्धापन दिनावर कोरोनाचे सावट आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायमच आहे. याचमुळे शिवसेनेने यंदाही पक्षाचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.