Ayurvedic Doctors | आयुर्वेदिक डॉक्टरांनी ऑपरेशन करावीत का? अॅलोपॅथिक डॉक्टरांचा विरोध योग्य आहे?
एबीपी माझा वेब टीम | 11 Dec 2020 07:07 PM (IST)
मुंबई : आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आय एम ए) राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या 219 शाखांमधील 45000 डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असलेले एकूण 1 लाख दहा हजार डॉक्टर्स सहभागी होतील. सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र तातडीने सेवा सुरु राहतील. यात आय.सी.यु., अपघातात सापडलेल्या रुग्णासाठी असलेली अत्यावश्यक सेवा, प्रसूतीसेवा सुरु राहतील.