Prada Kolhapuri | प्राडाच्या तज्ञ मंडळाची Kolhapur चप्पल लाईनला भेट
abp majha web team | 16 Jul 2025 11:14 AM (IST)
कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जगविख्यात डिझायनर ब्रँड प्राडाच्या तज्ञ मंडळाने कोल्हापुरातील चप्पल लाईनला भेट दिली. शिवाजी चौक परिसरातील चप्पल लाईनची त्यांनी पाहणी केली. कोल्हापूर चप्पलच्या डिझाईन आणि विक्रीसंदर्भात प्राडाच्या टीमने सविस्तर माहिती घेतली. काही दिवसांपूर्वी प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल यांच्यात वाद निर्माण झाला होता. प्राडाने त्यांच्या उत्पादनांमध्ये कोल्हापुरी चप्पलच्या डिझाईनचा वापर केल्याने हा वाद सुरू झाला होता. मात्र, त्यानंतर प्राडाने कोल्हापुरी चप्पलांना श्रेय दिले होते. या भेटीमुळे कोल्हापुरी चप्पल उद्योगाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे. प्राडाच्या या भेटीमुळे स्थानिक कारागिरांना आणि चप्पल उत्पादकांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे. या भेटीतून भविष्यात कोल्हापुरी चप्पल आणि प्राडा यांच्यात काही सहकार्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.