Majha Vishesh University Exams | परीक्षा होणारच, विनापरीक्षा डिग्री नाही,आता पुढे काय? माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम | 28 Aug 2020 07:06 PM (IST)
विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. यूजीसीच्या 6 जुलैच्या गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. ही तारीख राज्य सरकार पुढं ढकलू शकते, असं कोर्टानं म्हटलं आहे. आता परीक्षा तर होणारच हे नक्की झालं, मात्र या परीक्षा कसा प्रकारे घेतल्या जातील हा प्रश्न उभा राहतो, यासाठी ही एबीपी माझाची विशेष चर्चा!