Political Spat | Nitesh Rane आणि Aaditya Thackeray यांच्यातील राजकीय वैर कॅमेरात कैद
abp majha web team | 15 Jul 2025 03:30 PM (IST)
नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. याच वैरातून घडलेला एक प्रसंग कॅमेरात कैद झाला आहे. आदित्य ठाकरे हे पक्षामधील नेत्यांसोबत मीडिया स्टँडवर बोलण्यासाठी निघाले होते. त्यावेळी नितेश राणे आधीपासूनच तिथे उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी 'कोण बोलताय' अशी विचारणा केली. त्यावर कार्यकर्त्यांनी त्यांना नितेश राणे बोलत असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे माघारी फिरले. यावेळी त्यांनी "शिशी तिक कचरा साफ करायचं काम सुरू आहे" अशी टिप्पणी केली. हा प्रसंग राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेमुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.