Majha Vishesh | दिल्लीतील हिंसाचारामागे षडयंत्र? षडयंत्राचा ' 26 जानेवारी' प्लॅन कुणाचा?
एबीपी माझा वेब टीम | 27 Jan 2021 07:15 PM (IST)
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची चौकशी आता दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी क्राईम ब्रॅन्चची एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. मंगळवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात 300 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले आहेत. दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 22 एफआयआर दाखल केले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने हे प्रकरण आता गंभीर बनलं आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.