माझा विशेष : कशी व्हावी पंढरीची वारी? कोरोना संकटात वारकऱ्यांनी निर्बंध पाळणं किती गरजेचं?
एबीपी माझा वेब टीम | 14 Jun 2021 06:08 PM (IST)
Pandharpur Ashadhi Wari 2021 : पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे. आषाढीला पालख्या बसमधूनच येणार असल्याचं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी येणार असून एकादशी दिवशी शहरातील 195 महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे. यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात शासन आदेश निघाला असून पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे.