Kalamba Lake Overflow | कोल्हापूरमध्ये संततधार, Kalamba Lake दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो!
abp majha web team | 15 Jul 2025 11:50 AM (IST)
कोल्हापूरमधून एक महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूरकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला कळंबा तलाव पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कळंबा तलाव शंभर टक्के भरला असून सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे एक आकर्षक धबधबा तयार झाला आहे. आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी याचा आढावा घेतला आहे. कोल्हापूर शहराजवळ असलेला हा कळंबा तलाव यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाला आहे. कोल्हापूर शहर आणि कळंबा गावाला याच तलावातून पाणीपुरवठा होतो. गेल्या दहा दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती, त्यावेळी हा तलाव पुन्हा मागे होता. मात्र, कालपासून पावसाचा जोर वाढल्याने तलाव पुन्हा भरला. ओव्हरफ्लो झालेला तलाव पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. प्रशासनाने या ठिकाणी बंदोबस्त लावणे आवश्यक आहे. दोन वर्षांपूर्वी याच पाण्यातून दोन तरुण वाहून जाताना वाचले होते. त्यामुळे प्रशासनाने अतिउत्साही तरुणांवर कारवाई करावी. जिल्ह्यातील वारणा आणि राधानगरी धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.