Post Covid Disease : कसे टाळायचे कोरोनानंतरचे आजार? डॉ. श्रीकांत सहस्रबुद्धे आणि डॉ. राहुल तांबे
एबीपी माझा वेब टीम | 31 May 2021 06:22 PM (IST)
कोरोनानंतर आता 'म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. या आजारावर उपचारांचा खर्चही खूप होत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. या पार्श्वभूमीवर ‘म्युकरमायकोसिस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक 30 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.