Majha Vishesh SSR Case | संदिप सिंगने भाजप कार्यालयात 53फोन कुणाला केले? भाजप नेत्यांची चौकशी होणार?
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2020 05:24 PM (IST)
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी आता अनेक चेहरे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सीबीआयने सुशांत सिंह राजपूतशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींची चौकशी सुरु केल्यानंतर इथे राजकारणालाही उधाण आले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील संदीप सिंह याचे फोटो राज्यातील अनेक बड्या नेत्यांसोबत असल्याने ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचाच आधार घेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. संदीप सिंहला भाजप इतकं महत्त्व का देत आहे? संदीप सिंहने भाजपच्या कार्यालयात 53 वेळा कॉल केल्याचं उघड झालं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक तयार करण्याचे काम हे भाजपने संदीप सिंहला का दिलं?, 177 कोटी रुपयांचा MOU गुजरात सरकारने संदीप सिंहच्या कंपनीसोबत केला होता. याचे उत्तर आता भाजपने देणं गरजेचं असल्याचं सचिन सावंत यांनी सांगितलं आहे.