खबरदारीची 'आषाढी वारी' : आषाढीच्या वारीत यंदाही सुरक्षेला प्राधान्य,सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी नाही
एबीपी माझा वेब टीम | 11 Jun 2021 05:51 PM (IST)
पंढरपूर : गेल्या वर्षी आलेली कोरोनाची (Coronavirus) पहिली लाट खूपच सौम्य होती. मात्र यंदाची दुसरी लाट खूपच घटक सिद्ध झाली असून आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत .शेकडोंच्या प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत पालखी सोहळ्यातील (Ashadhi Wari) सर्वात शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी सोहळ्यांना पत्र लिहून पायी न येण्याची विनंती केली आहे .