Fake Currency | राज्यात १.४ कोटींच्या बनावट नोटा जप्त, Pune-Bhiwandi मध्ये कारखाने
abp majha web team | 16 Jul 2025 02:54 PM (IST)
राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत पोलिसांनी एक कोटी चाळीस लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी राज्यात दोनशे त्र्याहत्तर गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल पाचशे सहासष्ठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात पुण्यातील शिवाजीनगर आणि मुंबईजवळच्या भिवंडी येथे बनावट नोटा बनवण्याचे कारखाने असल्याचे उघड झाले आहे. गृह खात्याच्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. बनावट नोटांचे हे जाळे रोखणे हे पुढील काळात राज्य शासनासमोर एक मोठे आव्हान असणार आहे.