Majha Vishesh | धर्मांध हल्ल्यांमुळे सहिष्णुता धोक्यात? धर्म विरुद्ध आधुनिकता असा हा संघर्ष? माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम | 30 Oct 2020 09:52 PM (IST)
पॅरिस: फ्रान्सच्या नीस शहरात एका चर्चच्या बाहेर झालेल्या हल्लेखोराने केलेल्या एका हल्ल्यात तीन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात हल्लेखोराने चाकूचा वापर केला आहे. नीसच्या महापौरांच्या मते हा दहशतवादी हल्ला आहे. हल्लेखोराला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरु आहे. 16 ऑक्टोबरला अशाच प्रकारच्या हल्ल्यात एका शिक्षकाचा गळा कापण्यात आला होता.