ABP Majha Impact : पुण्यातील महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना मिळाले बाक, आयुक्तांची दखल
abp majha web team | 27 Jun 2025 07:22 PM (IST)
पुण्यातील बावधन बुद्रुक भागातील महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक नसल्याचे एबीपी माझाने दाखवले होते. आयुक्त नवल किशोर राम यांनी दखल घेऊन 60 बाक पुरवण्याचा निर्णय घेतला. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच बाकावर बसता आल्याने आनंद झाला आहे. एका विद्यार्थ्याने सांगितले, "मला खूप आनंद होतोय. बसलं होतं बेंचवरती कधीच नाही."