राज ठाकरे होत आहेत राजा भैया? | माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम | 13 Nov 2018 08:54 PM (IST)
मराठी नागरिकांचा कैवार घेणारे आणि परप्रांतीयांविरोधात कायमच विरोधी भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचाय संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.