Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Poonam Mahajan Majha Katta : वडील, हत्या आणि राजकारण; 'माझा कट्टा'वर पूनम महाजन यांचे मोठे खुलासे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPoonam Mahajan Majha Katta : वडील, हत्या आणि राजकारण; 'माझा कट्टा'वर पूनम महाजन यांचे मोठे खुलासे
हे देखील वाचा
Poonam Mahajan : प्रमोद महाजन रुग्णालयात होते, तेव्हा उद्धव ठाकरे 12 दिवस दररोज 2-3 तास रुग्णालयात आमच्यासोबत थांबायचे : पूनम महाजन
Poonam Mahajan on Majha Katta : भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी आज (दि.8) 'माझा कट्टा'वर ठाकरे आणि महाजन घराण्यातील संबंधाबाबत भाष्य केलं आहे. "भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती तुटली असली तरी प्रमोदजी आणि बाळासाहेबांचं असलेलं प्रेम हे राजकारणाच्या पलिकडे होतं. आताही माझे उद्धवजी आणि रश्मी वहिनींबरोबर चागंले संबंध आहेत. ते राजकारणाच्या पलिकडे आहे. ते जेव्हा दु:खातून जातात , तेव्ही मी त्यांच्याशी बोलते. मी जेव्हा दु:खातून तेव्हा ते माझ्याशी बोलतात. शिवाय सुखाच्याही गोष्टी शेअर केल्या जातात", असं म्हणत पूनम महाजन यांनी ठाकरे आणि महाजन यांच्यातील असणाऱ्या नात्याबाबत भाष्य केलं.
तेव्हा उद्धव ठाकरे 12 दिवस दररोज 2-3 तास रुग्णालयात आमच्यासोबत थांबायचे
पूनम महाजन म्हणाल्या, माझे वडिल जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते, पूर्ण देश त्यांना भेटायला आला. उद्धवजी लंडनला निघत होते, त्यांनी फ्लाईट कॅन्सल केली. 12 दिवस जसा घरातला माणूस असतो, त्याप्रमाणे उद्धवजी संध्याकळी 5-6 वाजता यायचे. वरती 15 व्या मजल्यावर बसायचे. तीन तास घरातील माणूस जसा सर्वांना अटेन करतो. तसं ते सर्वांशी बोलायचे, विचारायचे. मग रात्री जायचे. माझ्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचे पॉलिटिकल वार प्रतिवार याबाबत लिहलं जायचं. पण त्याच्या पुढं जाऊन काही असतं की नसतं? संबंध असतात. सध्या जे संबंध ताणले गेलेत ते भाजप आणि ठाकरेंमध्ये ताणले गेलेत आमच्यामध्ये नाहीत. याला मी महाराष्ट्र्ताली सर्व राजकीय पक्षांना धरते.