Nitin Gadkari Majha Katta : उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का? रोखठोक नितीन गडकरी 'माझा कट्टा'वर
abp majha web team | 18 Mar 2024 11:45 PM (IST)

Nitin Gadkari on Uddhav Thackeray, Majha Katta : "मागील काळात कारण नसताना काही गोष्टी पसरवण्यात आल्या. त्यातून आमच्याकडे या निवडणुकीची ऑफर वगैरे दिली. पण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. संघाचा स्वयंसेवक आहे. त्यामुळे माझा पक्ष, माझा विचार आणि संघटन हे मला सर्वपरी आहे. त्यामुळे माझा पक्ष सोडून दुसरीकडून उभे राहण्याचा प्रश्नच उरत नाही. ज्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या, त्यांना धन्यवाद.." काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आमच्याकडून लोकसभा निवडणूक लढवा, अशी ऑफर दिली होती. उद्धव ठाकरेंच्या या ऑफरला नितीन गडकरी यांनी माझा कट्टावर उत्तर दिलं आहे.