Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
abp majha web team | 11 Oct 2026 04:37 PM (IST)

आपली खाद्य संस्कृती... कारण महाराष्ट्रामध्ये मध्ये खाणं आणि गाणं या दोन्ही गोष्टी मनापासून जगल्या जातात. सणवारांच्या गोडधोड पदार्थांपासून ते झणझणीत सावजी, मालवणी, मराठवाड्यापर्यंत वैशिष्ट्यपूर्ण चवीपर्यंत ज्याचा नुसता उल्लेख झाला तरी देखील आपली भूक चाळवते. असंख्य भाज्या, कोशिंबिरी चटण्या, मुरांबे, लोणची आपल्या खाद्य संस्कृतीमधले नुसते प्रकार आणि पदार्थच इतके आहेत की यादी करणं देखील अवघड होईल आणि याच प्रश्नामधून एका अत्यंत महत्त्वाकांक्षी संशोधन प्रकल्पाची निर्मिती झाली आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्र खाद्य संस्कृती कोष ज्याचं मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन झालं आणि याच संशोधन प्रकल्पाचे मुख्य संपादक आणि प्रधान संशोधक महामहोपाध्याय प्राध्यापक डॉक्टर अभिजीत जोशी यांच्यासोबत माझा कट्ट्यावर दिलखुलास आणि मनमोकळ्या गप्पा....