Ramdas Kadam Majha Katta Full : रामदास कदम यांचे 'माझा कट्टा'वर मोठे गौप्यस्फोट ABP Majha
abp majha web team | 24 Jul 2022 07:59 AM (IST)

Ramdas Kadam Majha Katta : 1995 ला सेना-भाजप युतीची राज्यात सत्ता आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात असतानाही मला मंत्रीपद मिळाले नाही. फक्त मी राज ठाकरे यांच्यासोबत होतो म्हणून मला मंत्रीपद मिळाले नसल्याचे मत शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी व्यक्त केलं. रामदास तुझ्यामुळं माझ्या घरात भांडणे चालली असल्याचे बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर रामदास कदम आले होते. यावेळी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला शिवसेनेतील प्रवास आणि सध्या सुरु असलेल्या राजकीय स्थितीवर देखील भाष्य केलं.