संजीव कपूर कसे बनले मास्टरशेफ? फूड इंडस्ट्रीचं महत्त्व इतकं कसं वाढलं? माझा कट्टा : भाग 2
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jun 2021 11:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : आपल्याला आपली आवड चांगली माहिती असते. त्यामुळे कोणतंही पक्वान तयार करताना कधी कोणाची नक्कल करु नका. त्यापेक्षा आपल्याला जसं आवडतं तसे पदार्थ बनवण्यास शिका. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी आपण काही गोष्टी ठरवून ठेवल्यात आणि त्या आपण कधीच बदल नाही. मला वाटतं हेच आपण बदलायला हवं. आपल्या ठिकाणी ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करुनचं आपण पदार्थ बनवले पाहिजेत. कोणतीही स्थानिक गोष्टी तिथल्या वातावरणासाठी पौष्टीकचं असते, असं गुपित मास्टर शेफ संजीव कपूर यांनी सांगितलंय. संजीव कपूर आज माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.