Majha Katta | ..तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार : प्रकाश आंबेडकर | माझा कट्टा | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 08 Jun 2019 11:42 PM (IST)
"विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या नाहीत, तर त्यावर बहिष्कार टाकणार," अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. शिवाय, ईव्हीएममुळेच वंचित बहुजन आघाडीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते. विविध विषयांवर रंगलेला प्रकाश आंबेडकर यांच्या 'माझा कट्टा'चं प्रक्षेपण आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर होणार आहे. एमआयएमशी हातमिळवणी करुन वंचित बहुजन आघाडी जन्माला घालणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमविरोधात पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ईव्हीएमवर संशय उपस्थित करताना मोदी सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या आंबेडकरांनी, आता चक्क विधानसभेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे.