Rural News : यंदाच्या आषाढी सोहळ्यात पायी पालखी सोहळ्याला निर्बंध चालतील, बंदी नको : वारकरी संप्रदाय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 May 2021 10:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणावे लागल्यानंतर यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. कोरोनाचे निर्बंध चालतील मात्र बंदी नको, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. उद्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहू, आळंदी आणि इतर मानाच्या सात पालखी सोहळा संस्थांशी चर्चा करणार असून यातून मार्ग निघेल अशी वारकरी संप्रदायाला अपेक्षा आहे.