Khadse Taunts Fadnavis | मुख्यमंत्रिपद फडणवीसांना दान केलं, मुक्ताईनगरमधील खडसेंचं विधान व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Nov 2020 08:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे अनेक समर्थक आता राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतांना दिसत आहेत,आज मुक्ताई नगर तालुक्यातील कुऱ्हा गावात झालेल्या पक्ष प्रवेशानंतर खडसे यांनी पुन्हा एकदा देवेन्द्र फडणीस यांचं नाव न घेता टीका केली आहे. यावेळी बोलताना खडसे यांनी म्हटल आहे की मी स्पर्धक असल्याने माझ्या विरोधात विविध प्रकारचे आरोप लावण्यात आले ,माझा छळ करण्यात आला एवढंच काय तर विनय भंग सारखे गुन्हा दाखल करण्याच नीच राजकारण करण्यात आले,
ज्या पक्षाला मी लहानाच मोठं केलं तो पक्ष सोडावा वाटत नव्हता,मात्र आपलेच गद्दार झाले त्यामुळे कपटी मित्र पेक्षा दिलदार शत्रू बरा अस वाटलं,मी पक्ष सोडला नाही मला पक्ष सोडायला भाग पाडले यांनी.