Maharashtra Assembly Opposition Walkout | विधान भवनात विरोधी पक्षाचा गदारोळ, सरकारविरोधात घोषणाबाजी
abp majha web team | 08 Jul 2025 04:42 PM (IST)
विधान भवनात आज सकाळी विरोधीपक्षनेतेपदाबाबत बैठक पार पडली. या बैठकीला भास्कर जाधव, अजय चौधरी, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर सभागृहाचं कामकाज सुरू असताना विरोधकांनी तोच मुद्दा सभागृहातही उपस्थित केला. आपल्या दालनात यावर चर्चा झाल्याचं अध्यक्ष म्हणाले. यावर विरोधी आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी सभात्याग केला. त्यानंतर लगेचच या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरू केली. 'सरकारचा निकाल असो', '५० ठोके एकदम ठोके, महाराष्ट्र लुटणारं सरकारचा निकाल असो, निर्लज्ज सरकारचा निकाल असो' अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, विरोधीपक्ष पायऱ्यांवर आंदोलन करत असताना सत्ताधारी मंत्री, नेते यांचे त्यांनी घोषणा देत स्वागत केले. स्वागत करताना अनेक उपरोधिक घोषणाही दिल्या गेल्या.