हिंगोली : संपूर्ण कापसाचं पिक उपटून टाकलं
एबीपी माझा वेब टीम | 13 Aug 2018 02:53 PM (IST)
काही दिवसांपासून कपसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी त्रस्त झाले आहेत. महागड्या फवारण्या करूनही बोंडअळी आटोक्यात येत नसल्यानं अखेर पीक उपटून टाकण्याचा निर्णय हिंगोलीतल्या काही शेतकऱ्यांनी घेतलाय. हिंगोली जिल्ह्यातील इडोळीतील शेतकरी श्रीराम जाधव यांच्याकडे वडिलोपार्जित 15 एकर शेती आहे. त्यानी त्यातील चार एकरात कपाशीची लागवड केली होती. मात्र काही दिवसांपासून कपाशीला फुले लागताच बोंडअळीने घाला घातल्याने श्रीराम जाधव या शेतकऱ्याला मोठा फटका बसला, त्यांनी चार एकर कंबरेपर्यंत वाढलेला कापूस उपटून टाकलाय.