Delhi Farmer Protest 'तीनही कायदे रद्द करून लिखित स्वरुपात द्या', शेतकरी नेत्यांची केंद्र सरकारकडे मागणी
एबीपी माझा वेब टीम | 03 Dec 2020 08:24 PM (IST)
नवी दिल्ली : पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ पद्मविभूषण पुरस्कार परत केला. तसेच शिरोमणी अकाली दल (डेमोक्रेटिक) प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार सुखदेवसिंग धिंदसा यांनी देखील कृषी कायद्याच्या निषेधार्थ पद्मभूषण परत करण्याची घोषणा केली आहे.