Ramdas Athawale Discharged | कोरोनावरील यशस्वी उपचारांनंतर रामदास आठवलेंना डिस्चार्ज
एबीपी माझा वेब टीम | 08 Nov 2020 06:27 PM (IST)
‘गो कोरोना गो’चा नारा देणारे देशाचे सामाजिक न्याय राज्य मंत्री आणि आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाचा लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोना वर मात केली असून ते आज कोरोनावर मात करून घरी परतले आहे. बारा दिवसांपूर्वी त्यांना कोरोना झाल्याने बॉम्बे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मात्र आता त्यांनी कोरोना वर मात केली असून त्यांची स्वब टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा देखील उपस्थित होते. त्यांनी आपण आता एकदम बरे झालो असून लोकांची सेवा करण्यास आता एकदम तयार असल्याचे सांगितले.