WEB EXCLUISIVE | कुर्ला-अंधेरी रस्ता रुंदीकरणास सुरुवात, आमदार दिलीप लांडेंच्या हस्ते शुभारंभ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Nov 2020 05:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेले 20 वर्षापासून रुंदीकरणापासून प्रलंबित आणि दुर्लक्षित असलेला मुंबईमधील अतिमहत्त्वाचा कुर्ला-अंधेरी रोड रुंदीकरण व सुधारणा करण्याच्या कामास आजपासून अखेर सुरुवात झाली. या रस्त्यावरील तोडक कारवाई करण्याचा शुभारंभ स्वतः शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी जेसीबी चालवत केला. कुर्ला-अंधेरी रोड हा आंतराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा रस्ता आहे. कुर्ला, विद्याविहार, अंधेरी, पवई, साकीनाका, घाटकोपर आदी विभागाकडे जाणारा एकमेव वाहतुकीचा रस्ता आहे. सदर रस्ता रुंदीकरणाअभावी वाहतूक तासनतास खोळंबते.