Dombivali : मद्यधुंद व्यक्तीला महिलेकडून चोप, जाणून घ्या काय आहे प्रकरण
abp majha web team | 27 Mar 2022 02:38 PM (IST)

डोंबिवलीत ब्युटी पार्लर चालक महिलेने एका मद्यधुंद व्यक्तीला चांगलाच चोप दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काल रात्री एक व्यक्त मद्यधुंद अवस्थेत एका ब्युटीपार्लरमध्ये घुसला. यावेळी ब्युटीपार्लर मधील महिलेने त्याला बाहेर जाण्याची विनंती केली. मात्र हा व्यक्ती बाहेर जात नसल्यानं संतापलेल्या महिलेने त्याला ब्युटी पार्लर बाहेर काढत चोप दिलाय.