MS Dhoni gloves | धोनीचा बॅज आयसीसीला का खटकतोय? | माझा विशेष | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2019 08:18 PM (IST)
टीम इंडियाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने आपल्या ग्लोव्ह्जवर लावलेला सेनादलाचा बलिदान बॅज काढून ठेवावा, अशी विनंती आयसीसीने बीसीसीआयला केली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात धोनीने पॅरा कमांडोजच्या युनिफॉर्मवर दिसणारा बलिदान बॅज आपल्या ग्लोव्हजवर लावला होता. भारताच्या माजी कर्णधाराच्या मनात भारतीय सेनादलाविषयी आदराची भावना आहे. सेनादलाच्या पॅरा रेजिमेंटने त्याला मानद लेफ्टनंट कर्नलचा हुद्दा देऊन सन्मानितही केलं आहे. धोनीने विश्वचषक सामन्यात बलिदान बॅज असलेले ग्लोव्हज वापरुन भारतीय सेनादलाविषयीची आपल्या मनातली भावना पुन्हा अधोरेखित केली.