712 यवतमाळ: कापसावर पुन्हा गुलाबी बोंडअळीचं संकट
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2018 08:17 AM (IST)
खरीपातील पेरण्यांमध्ये कापसाखालील क्षेत्रही कमी झालंय. यामागे बोंडअळीचं संकट कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या वर्षी गुलाबी बोंडअळीने कापसाचं मोठं नुकसान केलं. कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्य़ा महाराष्ट्रात कापूस उत्पादनाच्या आकड्यात घट झाली. विदर्भातील अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये बोंडअळीचा सर्वाधिक नुकसान झालं. नियंत्रणासाठी नियोजन करुनही यवतमाळमधील शेतांमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आलाये.