712 | सोलापूर | नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2018 08:42 AM (IST)
सोलापुरातील तडवळ गावानं राज्यातील शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श निर्माण केलाय. या गावामध्ये ९५ टक्के शेतकरी नियमित कर्जफेड करतात. अशाच शेतकऱ्यांच्या सत्कारासाठी स्टेस बँक ऑफ इंडियाने कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जवळपास ५०० शेतकऱ्यांचा यामध्ये सत्कार करण्यात आला.