Pooja Chavan Suicide Case | संजय राठोड आहेत कुठे? 8 दिवसांनंतरही गुन्हा का नाही?, विरोधकांचा सवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Feb 2021 09:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपूर्वी पुणे शहरातील वानवडी परिसरात पूजा चव्हाण नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. सोशल मीडियावर 'टिक-टॉक स्टार' अशी पूजाची ओळख होती. अशातच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अनेक नवनवी माहिती समोर येऊ लागली आहे. अशातच आता भाजपकडून थेट संजय राठोड यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.