Whatsapp Trick To read deleted Messages: सध्या व्हॉटसॲप हे संवाद साधण्याचं मुख्य माध्यम झालंय. व्हॉटसॲपवरून आपल्या ओळखीतल्या बहुतांश जणांकडे व्हॉट्सअॅप असतंच. आता या ॲपमध्ये बरीच फिचर्स आल्यानं आपण एकदा केलेला मेसेज डिलीटही करू शकतो. पण याचा अनेकजण गैरफायदा घेताना दिसून येत असून याबाबत गैरव्यवहार होण्याचे प्रमाणही दुसऱ्याबाजूला वाढताना दिसत आहे. सहज केलेला मेसेज डिलिट करता येत असल्यानं अनेक गैरसमज होतात. पण आता मेसेजमध्ये काय लिहीलं होतं ही उत्सूकता प्रत्येकाच्या मनात एकदातरी डोकावून जातेच. आता हा डिलिट केलेला मेसेज वाचण्याचा एक भन्नाट उपाय आहे. या ट्रीकने तुम्हाला डिलीट केलेला व्हॉट्सॲपवरील मेसेज वाचणं शक्य होणार आहे.


नोटीफिकेशन सेटिंग येतील कामी


व्हॉट्सॲपवरील डिलीट करण्यात आलेला मेसेज वाचण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काही सेटींग्स ऑन कराव्या लागतील. यावरून तुम्हाला सरळ हिस्ट्री चेक केली तरी डिलीट केलेल्या मेसेजमध्ये काय होते हे कळेल. 
व्हॉटसॲपवरील डिलीट करण्यात आलेले मेसेज वाचण्यासाठी फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. येथे तुम्हाला नोटिफिकेशन ऑप्शन दिसेल, नोटिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर More किंवा Advanced Settings वर क्लिक करा. हे वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये वेगवेगळ्या नावांसह असू शकते. आता इथे तुम्हाला नोटिफिकेशन हिस्ट्रीचा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक करा. तुम्ही नोटिफिकेशन हिस्ट्रीवर क्लिक करताच तुम्हाला येथे डिलीट केलेले मेसेज दिसतील.


..तर दिसणार नाहीत डिलीटेड मेसेज


जर तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनचा पर्याय तुम्ही ऑन केलेला नसेल तर डिलीट केलेले मेसेज तुम्हाला वाचता येणार नाहीत. व्हॉट्सॲप रोज काही नवीन अपडेटवर काम करत असते. वापरकर्त्यांच्या सोयीसाठी आणि व्हॉट्सॲप ऍप्लिकेशनमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरमुळे तुमची पर्सनल सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होते. हा मेसेज तुम्हाला दाखवला जातो कारण तो तुमच्या नोटीफिकेशनला सेव्ह झालेला असतो. पण जर तुम्ही व्हॉटसॲप नोटीफिकेशनला कंटाळून नोटिफिकेशन बंद केले नसेल तर ही ट्रीक तुम्हाला उपयोगी पडणार नाही. कारण जर व्हॉट्सॲप मेसेजचे नोटिफिकेशन चालू केले असेल तरच त्या मेसेजचे नोटिफिकेशन तुमच्या नोटिफिकेशनमध्येही येते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नोटिफिकेशन हिस्ट्री पाहता, तेव्हा व्हॉट्सॲपचे हे डिलीट केलेले मेसेजही दिसतात.


हेही वाचा:


ऑडी इंडियन भारतात आणली गोल्ड एडिशनची आलिशान 'Audi Q8', डिझाईन, स्पेससह किंमत जाणून घ्या