Whatsapp New Feature : लोकप्रिय मेसेंजर अॅप व्हॉट्सअॅप (Whatsapp) वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअरिंग करू शकता. व्हॉट्सअॅपने हे नवीन स्क्रीन शेअरिंग फिचर लॉन्च केलं आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या फीचरमुळे व्हिडीओ कॉलिंगचा अनुभव खूप खास होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे फीचर मायक्रोसॉफ्ट मीट (Microsoft Meet), गुगल मीट (Google Meet) आणि झूम (Zoom) तसेच ऍपलच्या फेसटाइमसह व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप्सशी स्पर्धा करणार आहे. म्हणजेच, जर तुम्हाला व्हिडीओ कॉल-मीटिंग दरम्यान स्क्रीन शेअर करायची असेल, तर तुम्ही सहजपणे कोणाशीही स्क्रीन शेअर करू शकता. यासाठी तेथे एक ऑप्शन उपलब्ध असेल. याबरोबरच अॅपमध्ये लँडस्केप मोडही उपलब्ध असेल. म्हणजेच, तुम्ही व्हिडीओ उभ्या तसेच लँडस्केप मोडमध्ये दाखवू शकाल. हे नवीन फिचर कसे काम करेल ते जाणून घेऊयात. 


मार्क झुकेरबर्ग यांची घोषणा 


मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी मंगळवारी फेसबुक पोस्ट आणि त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे या फीचरची घोषणा केली. हे नवीन फिचर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स, फोटो आणि अगदी तुमची शॉपिंग कार्ट व्हिडीओ कॉलवर उपलब्ध संपर्कांसह शेअर करण्याची परवानगी देईल. WhatsApp ने मे 2023 च्या अखेरीस Android वर काही बीटा टेस्टर्ससाठी हे फीचर सादर केले होते.


'शेअर' आयकॉनवरून प्रवेश केला जाऊ शकतो


'शेअर' आयकॉनवर टॅप करून किंवा क्लिक करून व्हॉट्सअॅपवर स्क्रीन शेअरिंग करता येते, असं मार्क झुकरबर्ग यांचं म्हणणे आहे. TechCrunch च्या बातमीनुसार, यूजर्स विशिष्ट अॅप शेअर करणे किंवा त्यांची पूर्ण स्क्रीन यापैकी एक निवडू शकतात. Google Meet आणि Zoom सारख्या विशिष्ट व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मवर स्क्रीन शेअरिंग नेमके असेच कार्य करते. मिळालेल्या बातम्यांनुसार, स्क्रीन शेअरिंग फीचर (WhatsApp स्क्रीन शेअरिंग फीचर) अँड्रॉइड, iOS आणि विंडोज डेस्कटॉपवर फेजवार रोल आउट सुरू करण्यात आले आहे. म्हणजेच ही सुविधा लगेच दिसणार नाही तर यासाठी यूजर्सना काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.  


नोव्हेंबर 2016 मध्ये व्हिडीओ कॉलिंग सुरू झाले


व्हिडीओ कॉलिंग हे WhatsApp वर गेल्या सहा वर्षांहून म्हणजेच नोव्हेंबर 2016 पासून अपडेटेड आहे. अलीकडच्या काळात व्हॉट्सअॅप सतत नवनवीन फीचर्स जोडत आहे. आपली सेवा अधिक सुधारत आहे. कंपनीने अलीकडेच WhatsApp iOS वर व्हिडीओ कॉलसाठी पिक्चर-इन-पिक्चर सपोर्ट आणलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Jio Affordable 5G Smartphone : जिओ आणणार सर्वात स्वस्त 5G मोबाईल! जाणून घ्या काय आहेत भन्नाट फिचर्स आणि किंमत