Whatsapp Status New Feature : सोशल मीडियावरील (Social Media) सर्वात लोकप्रिय फीचर व्हॉट्सअप (WhatsApp) आपल्या यूजर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचरवर काम करत असतात. स्क्रीनशॉट ब्लॉक करण्यापासून ते अवतार फीचर अॅक्टिव्ह करण्यापर्यंत व्हॉट्सअपने अलिकडेच हे नवीन फीचर आणले आहेत. आता व्हॉट्सअपने जे नवीन फीचर आणलं आहे ते तुमच्या आमच्या सर्वांच्याच आवडीचं आणि फायद्याचं आहे. अर्थात, व्हॉट्सअप स्टेटस संबंधित हे अपडेट आहे. या नवीन फीचरमध्ये यूजर्स स्टेटस अपडेटमध्ये एक मिनिटाचा व्हिडीओही (Video) शेअर करू शकणार आहेत.
आतापर्यंत व्हॉट्सॲप स्टेटसवर (Whatsapp Status) फक्त 30 सेकंदाचा व्हिडीओ अपलोड करता येत होता. पण, आता स्टेटसचा टाईम स्पॅम वाढविण्यात आला आहे. WABetaInfo ने या नवीन फीचरच्या संदर्भात माहिती दिली आहे. एवढंच नाही तर, WABetaInfo ने नवीन फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.
अखेर प्रतीक्षा संपली!
व्हॉट्सअप कंपनीने हे नवीन फीचर सध्या बीटा यूजर्ससाठी सुरु केलं आहे. बीटा यूजर्स Android 2.24.7.6 साठी WhatsApp बीटामध्ये हे अपडेट पाहू शकतात. सध्या बीटा व्हर्जनवर या फीचरची टेस्टिंग सुरु आहे. यूजर्स बऱ्याच दिवसांपासून व्हॉट्सअप स्टेटसमध्ये मोठे व्हिडीओ शेअर करण्याच्या फीचरची मागणी करत होते. अखेर यूजर्सची ही प्रतीक्षा आता संपली आहे. बीटा टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतरच हे फीचर जागतिक यूजर्ससाठी आणलं जाणार आहे.
आणखी एका फीचरवर काम सुरु
व्हॉट्सअप स्टेटस अपडेट फीचरशिवाय व्हॉट्सॲप कंपनी आणखी एका फीचरवरही काम करत आहे. या फीचरमध्ये तुम्ही व्हॉट्सॲपवर UPI पेमेंटसाठी QR कोड स्कॅन करू शकणार आहात. WABetaInfo च्या अहवालात असं म्हटलं आहे की कंपनी या फीचरची बीटा चाचणी करत आहे, त्यानंतरच हे फीचर जागतिक यूजर्ससाठी सुरु करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :