Zomato UPI Service : देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने (Zomato) यूपीआय सेवेला सुरुवात केली आहे. यासाठी कंपनीने आयसीआयसीआय बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, यूपीआय सेवेच्या माध्यामातून ग्राहकांना पेमेंट करण्याची सुविधा आणखी चांगली मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. झोमॅटोच्या यूपीआय सेवांमध्ये युझर्सना केवायसी फॉर्म भरणं गरजेचं नाही. तसेच, युझर्स आपला वैयक्तिक यूपीआय आयडी तयार करण्यासाठी सक्षम असणार आहेत. यामुळे पेमेंट ट्रान्झॅक्शन करण्यासाठी सुरक्षितता वाढणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. Zomato UPI Service कशी आहे? या सेवेमुळे ग्राहकांना कोणता फायदा होणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया... 


Zomato UPI सेवा सुरु 


नुकतीच झोमॅटोने यूपीआय सेवा सुरु केली आहे. ही सेवा सुरु करण्यामागील कंपनीचा मुख्य उद्देश्य, लोकांसाठी ऑनलाईन पेमेंटची चांगली सुविधा उपलब्ध करुन देणे हा आहे. या यूपीआय सेवेमुळे ग्राहकांना झोमॅटो अॅपच्या माध्यमातून पेमेंट करणे अत्यंत सोपं होणार आहे. परंतु, यासाठी ग्राहकांना कोणतेही एक बँक खाते सेव्ह केल्यानंतर नवीन यूपीआय ओळखपत्र बनवावं लागणार आहे. तसेच, सध्या जे लोक पेमेंट करण्यासाठी Paytm, PhonePe आणि Google Pay सारख्या यूपीआय प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत त्यांना त्यावर रिडायरेक्ट करण्याची आवश्यकता पडणार नाही.


तुमच्यासाठी Zomato UPI सेवा उपलब्ध आहे का? 


सध्या झोमॅटोची यूपीआय सेवा काही मोजक्या युझर्ससाठीच उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सेवा तुम्हाला उपलब्ध आहे की नाही, यासाठी झोमॅटो अॅपच्या प्रोफाईल सेक्शनमध्ये जाऊन तपासून शकता. पण कंपनी लवकरच सर्व युझर्ससाठी यूपीआय सेवा उपलब्ध करुन देणार असल्याचं समजतं. त्यामुळे येणाऱ्या काळात झोमॅटोच्या यूपीआय सेवांसोबत इतर बँकाही पार्टनशिप करण्याची शक्यता आहे. पण सध्या तरी Zomato Gold यूझर्स अॅपच्या सेटिंग सेक्शनमध्ये जाऊन ही सेवा पाहू शकतात.  


Zomato UPI सेवा कशी सुरु करता येईल? 


सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन झोमॅटो ओपन करा. यानंतर प्रोफाईल सेक्शनमध्ये प्रवेश करा आणि Zomato UPI सेक्शन सर्च करण्यासाठी खाली स्क्रोल करा. तुम्हाला यामध्ये अॅक्टिव्ह Zomato UPI या ऑप्शनची निवड करा. ही निवड केल्यानंतर तुम्हाला यूपीआय आयडी द्यावा लागेल आणि तुमच्या मोबाईल क्रमांकांची पडताळणी करा. यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी बँक खातं जोडण्यासाठी सांगितलं जाईल. यानंतर झोमॅटो यूपीआय सेवा सुरु होईल.