मुंबई : गुगलने (Google) त्याच्या युजर्ससाठी प्रायव्हसी फिचर अपडेट केलं आहे. त्यासाठी आता  Google Chrome ब्राउझरमध्ये (Brower) सेफ्टी चेक हे नवं फिचर आणलं आहे. तसेच हे फिचर ऑटेमॅटिक आहे.  म्हणजेच, जेव्हा तुम्ही सेटिंग्जमधून ते चालू करता तेव्हा ते तुम्हाला विविध वेबसाईट्स आणि इत्यादींविषयी सविस्तर माहिती देईल. हे वैशिष्ट्य तुम्हाला हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अलर्ट देते जेणेकरुन तुम्ही वेळेवर पासवर्ड बदलू शकाल किंवा आवश्यक कारवाई पूर्ण करू शकाल. नवीन अपडेटमध्ये कंपनी सिक्युरिटी चेक फीचर ऑटोमेट करणार आहे. म्हणजे ते बॅकग्राउंडमध्ये चालत राहील आणि गरज पडेल तेव्हा तुम्हाला माहिती देईल.


गुगलचे सेफ्टी चेक फीचर त्या वेबसाइट्सवरही लक्ष ठेवते ज्यांना तुम्ही आधी कामासाठी परवानगी दिली होती आणि आता तुम्ही वापरत नाही. हे वैशिष्ट्य अशा सर्व वेबसाइटवरील तुमचा एक्सेस काढून टाकतात आणि त्याची माहिती देखील तुम्हाला देते. त्यामुळे तुमचा डेटा सेफ राहण्यास मदत होते. 


लवकरच मिळणार 'हे' फिचर 


सेफ्टी चेक व्यतिरिक्त कंपनी ब्राउझरमध्ये अनेक नवीन फीचर्स देखील देत आहे. लवकरच तुम्ही ग्रुप्स केलेले टॅब सेव करु शकणार आहात.  जेणेकरून तुम्ही ते तुमच्या वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर सहजपणे वापरू शकता. येत्या काही आठवड्यांमध्ये कंपनी हे फिचर युजर्सना वापरता येणार आहे. यामुळे युजर्सना बराच फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


AI वैशिष्ट्ये देखील लवकरच उपलब्ध होणार


कंपनीने सांगितले की ते पुढील वर्षापासून ब्राउझरमध्ये जेमिनी एआय फिचर देखील देणार आहे. त्यामुळे युजर्सना वापरण्यास अधिक सोपं जाईल. कंपनीच्या सीईओने स्वतः अनेकदा याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे आता  ब्राउझरमध्ये हे  AI फिचर किती फायदेशीर ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कंपनीने नॅनो, प्रो आणि अल्ट्रा व्हर्जनमध्ये जेमिनी एआय लाँच केले आहे. या टूलचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकाच वेळी अनेक कामे करू शकते.


गुगल मॅप्समध्येही नवे फिचर 


 एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही सर्वांनी Google Maps वापरत असाल. आता या अॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स आणले जातायत. ज्यामुळे तुम्हाला एक नवा अनुभव देखील मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे पैसा आणि वेळही वाचणार असल्याचं सांगण्यात येतंय. गुगल नवीन वर्षापासून या अॅपमध्ये 'फ्युएल एफिशियंट रूटिंग' फीचर आणत आहे. मात्र, त्यावेळी ते फक्त अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांपुरतेच मर्यादित होते. आता गुगल नवीन वर्षापासून भारतातही हे फीचर देणार आहे.


हेही वाचा : 


Christmas WhatsApp Sticker : तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमच्या मित्रांना सांता आणि मेरी ख्रिसमसचे स्टिकर्स पाठवायचेत? जाणून घ्या सोप्या टिप्स