Flipkart Launches UPI Handle : ई-कॉमर्स मार्केट प्लेस फ्लिपकार्टने (Flipkart आज आपले UPI (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) हँडल लॉन्च केलं आहे. कंपनीचे 500 मिलियनहून अधिक ग्राहक असल्याची माहिती आहे, आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जातंय. 


न्यूज एजन्सी IANS च्या ताज्या अहवालानुसार, Flipkart UPI सह, यूजर्स ऑनलाईन-ऑफलाईन व्यापारी व्यवहारांसाठी स्वतःचे UPI हँडल सेट करू शकतात. ग्राहकांचा अनुभव सुधारत असतानाच कंपनीने सुपरकॉईन, कॅशबॅक, ब्रँड व्हाउचरची सुविधाही सुरू केली आहे.


आता अशा प्रकारे फ्लिपकार्टवर पेमेंट करा


Flipkart ॲपवर Flipkart UPI द्वारे उत्पादनांसाठी पेमेंट करता येणार आहे. यासाठी, प्रोडक्ट निवडल्यानंतर, पेमेंट ऑप्शनवर UPI आयडी आणि पे स्कॅन करण्याचा पर्याय दिसेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार यूजर्स रिचार्ज आणि बिल पेमेंट देखील करू शकतात.


पहिल्या टप्प्यात, Flipkart ने ॲक्सिस बँकेसोबत भागीदारी केली आहे ज्यामुळे यूजर्सना Flipkart ॲप वापरून आपल्या डिजिटल व्यवहारांसाठी @fkaxis हँडलसह UPI साठी नोंदणी करता येईल.


या संदर्भात, Flipkart मधील Fintech आणि Payments Group चे वरिष्ठ उपाध्यक्ष धीरज अनेजा म्हणाले की, Flipkart UPI ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन लॉन्च करण्यात येत आहे. ग्राहकांसाठी सोयीस्कर असण्याबरोबरच ते खर्च कमी करण्याचेही एक साधन असेल. धीरज अनेजा पुढे म्हणाले की, फ्लिपकार्टवर, आम्ही सुपरकॉईन्स, ब्रँड व्हाउचर आणि इतर बक्षिसे आणि फायदे यांच्या मालिकेसह सुरक्षित आणि सोयीस्कर पेमेंट पर्याय देत आहोत. आम्ही ग्राहकांचा वाणिज्य अनुभव सुधारत आहोत.


संजीव मोघे, अध्यक्ष आणि प्रमुख – कार्ड्स अँड पेमेंट्स, ॲक्सिस बँके, म्हणाले, “UPI मध्ये, आम्ही भागीदारी आणि नावीन्यपूर्णतेने आमच्या विकासाला चालना देत आहोत. Flipkart सोबतची आमची भागीदारी भारतातील सर्वात यशस्वी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच करण्यापासून ते आता Flipkart UPI सेवा सुरू करण्यापर्यंत खूप पुढे गेली आहे.


ग्राहक आता @fkaxis हँडलसह UPI साठी नोंदणी करू शकतात आणि Flipkart ॲप वापरून सर्व फंड ट्रान्सफर आणि चेकआउट पेमेंट करू शकतात.


महत्त्वाच्या बातम्या :


Offline Netflix : तुम्ही इंटरनेटशिवाय Netflix वर चित्रपट आणि वेब सिरीज पाहू शकता; फक्त 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा