YouTube New Feature : गुगलच्या व्हिडीओ (You Tube)  स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबवर कंपनीने पॉडकास्ट (Podcast) क्रिएटर्ससाठी (Creators) एक नवीन फीचर लाँच (New Feature Launch) केलं आहे. याअंतर्गत क्रिएटर्स आता आपले पॉडकास्ट सहज अपलोड करू शकणार आहेत. कंपनी यूट्यूब स्टुडिओमध्ये पॉडकास्ट व्हिडीओ शेअर करण्याचा नवा पर्याय देत आहे. ते यूट्यूब तसेच यूट्यूब म्युझिकवर शेअर करू शकतील. पॉडकास्टर यूट्यूब म्युझिक होमपेजवर पॉडकास्ट पर्यायाचा ही फायदा घेऊ शकतात. युजर्स युट्यूब म्युझिकवर ऑन-डिमांड, ऑफलाइन आणि बॅकग्राऊंडमध्ये पॉडकास्ट ऐकू शकतील. यामुळे क्रिएटर्सना जाहिराती आणि सब्सक्रिप्शनमधून अधिक पैसे मिळतील आणि त्यांना जास्त पैसे मिळतील.


युट्युबवरही तुम्ही पैसे कमवू शकता!


यूट्यूब हा केवळ पैसे कमावण्याचा एक मार्ग नाही, तर कंपनी क्रिएटर्सना लाइव्ह स्ट्रीमदरम्यान फॅन फंडिंग किंवा सुपर चॅटसह अनेक पर्याय देते. डिसेंबर 2022 पर्यंत फॅन फंडिंगच्या माध्यमातून पैसे कमावणाऱ्या चॅनल्सची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढली असून या चॅनल्सची बहुतांश कमाई फॅन फंडिंगच्या माध्यमातून होत असल्याचे कंपनीनं सांगितलं आहे. ब्रँड प्रमोशन, डील्स यामधूनही त्याचे यूट्यूबवर चांगले पैसे कमवू शकतात. युट्यूब चॅनेलमधून तुम्ही किती कमाई कराल हे तुमच्या चॅनेलवर चालणाऱ्या जाहिरातींवर अवलंबून असते.


ब्रँड कंटेंट 


काही काळापूर्वी यूट्यूबने ब्रँड कंटेंटदेखील सुरु केला आहे, जो सध्या भारतातील काही क्रिएटर्स आणि एडवटाइजर्स उपलब्ध आहे. ब्रँड कंटेंट अंतर्गत, कंपनी क्रिएटर्स आणि एडवटाइजर्सला सहजपणे जोडण्याचे काम करते जेणेकरून काम सुरळीत होण्यास मदत होते. क्रिएटर्स आणि एडवटाइजर्स एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात आणि आवडत्या आणि कंपनीशी निगडीत असलेल्या ब्रँडसोबत कनेक्ट होऊ शकता. 


व्हिडीओ पाहता पाहता गेम खेळू शकाल!


Google चे व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube एका नवीन फिचरची (New Feature)  चाचणी करत आहे, जे यूजर्सना प्लॅटफॉर्मवर गेम डाउनलोड आणि इंस्टॉल न करता खेळण्यास परवानगी देईल. कंपनी Playables नावाच्या फीचरवर सध्या काम करत आहे. सप्टेंबरमध्ये, कंपनीने घोषणा केली होती की, यूजर्स मोबाईल आणि डेस्कटॉप या दोन्ही प्लॅटफॉर्मवर HTML5 आधारित गेम खेळू शकतील. सध्या हे फिचर काही मर्यादित यूजर्ससाठी उपलब्ध आहे. कंपनीने होम फीडमध्ये Playables नावाचे नवीन फीचर जोडले आहे. अँड्रॉईड अथॉरिटीच्या अहवालात कंपनीचे एक नवीन फिचर दिसून आले आहे, ज्याचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Poco M6 5G Launch : नवीन 5G फोन घेण्याचा प्लॅन आहे, POCO चा स्वस्त्यात मस्त नवा कोरा फोन लाँच; कोणते फिचर्स मिळणार?